You are currently viewing निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची सावंतवाडी आणि कुडाळ येथे भेट

निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची सावंतवाडी आणि कुडाळ येथे भेट

निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची सावंतवाडी आणि कुडाळ येथे भेट

मतदान प्रक्रीयेत सहभागी होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सुचनांचा काटेकोर अभ्यास करण्याचे निर्देश

 सिंधुदुर्गनगरी

 निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदान प्रक्रीये दरम्यान अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करु नये या सुचनांचा काटेकोर अभ्यास करावा.  त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी.  त्यासाठी निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सिंधुदुर्ग  जिल्हा प्रशासनाद्वारे विविधस्तरीय कार्यवाही सातत्याने व योग्य प्रकारे करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून मतदान प्रक्रियेमध्ये थेट सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष/मतदान अधिकारी यांचे  पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सावंतवाडी आणि कुडाळ येथे आयोजित करण्यात आले होते.  यामध्ये सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृह  तसेच कुडाळ येथे प्रशिक्षणासाठी  उपस्थित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांशी निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी भेट देऊन संवाद साधला.  तसेच त्यांच्या अडीअडचणी व अपेक्षाही जाणून घेतल्या. प्रशिक्षणानंतर त्यांनी सावंतवाडी येथील स्ट्रॉंग रूमची देखील पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सावंतवाडी हेमंत निकम, सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी,दोडामार्ग तहासिलदार अमोल पोवार,  अपर तहसिलदार मोनिका कांबळे,   सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुडाळ,  श्रीमती ऐश्वर्या काळुसे, कुडाळचे तहसिलदार विरसिंग वसावे आणि मालवणच्या तहसिलदार वर्षा झाल्टे  यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. सिंह म्हणाले की, आपल्यावर असलेली जबाबदारी ही खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व बाबी, पूरक साहित्य, त्याचा वापर, मतदान केंद्रावर घ्यावयाची आवश्यक खबरदारी या सर्व बाबी गतिमानतेने, अचूकपणे पार पाडण्याची  जबाबदारी मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांची आहे. आपल्याला दिलेली जबाबदारी आणि काम अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्याच्या भूमिकेतून सर्वांनी या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उपयोग करून घ्यावा. त्याचबरोबर प्रशिक्षणादरम्यान आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंका व प्रश्न आपल्या प्रशिक्षकांना मनमोकळेपणाने विचारा आणि त्यांचे निराकरण करून घ्या असेही श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा