*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सांगा कोण कुणाचे*
******************
कुठे राहिली माणसांची नाती
आज सारी सारी विखुरलेली
सुखावती , श्वापदांचे कळप
सदा सदा चालती संगसंगती…..
मानव आज सुशिक्षित झाला
सुखाची , व्याख्याच बदलली
आजकाल भौतिक प्रलोभने
जीवाजीवा , सुखावु लागली…..
दृष्टांत हा कलियुगाचा आता
भोवतो , अंतराला भोवताली
प्रेम , जिव्हाळा आता संपला
जाहली , काळजाची काहिली
सांगा कोणकुणाचे उरले आहे
प्रीतभावनांच सर्वत्र लोपलेली
***********************
*रचना क्र. ६१ / २ /४ / २०२४*
*#©️ वि .ग. सातपुते.(भावकवी )*
*📞( 9766544908 )*