*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षात्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*
*(श्री गजानन विजय ग्रंथ)*
अध्याय बारावा
कथा सुरस बाराव्या
अध्यायाची आता ऐका
पट्टशिष्य पितांबर
लागे न श्रवणा पैका ||
पितांबर जीर्ण धोती
मठी सदा नेसतसे
श्रीं नी किंमती दुपेटा
ल्यावयास दिला असे ||
टोचू लागे अन्य शिष्य
तुझे कैसे शिष्यपण
वस्त्र नेससी हो श्रींचे
करी त्यांचा अवमान ||
आज्ञा मानली मी त्यांची
कैसी होई ही अवज्ञा
शिष्यगणी तेढ माजे
दूर जाण्या श्रींची आज्ञा ||
आला आसवे पुसत
पितांबर कोंडोलीत
आम्रवृक्षातळी बैसे
गुरू नाम वैखरीत ||
मुंगळ्यांच्या त्रासाने हा
फिरे सान फांद्यांवरी
थक्क झाले हो गुराखी
नाही पडला भूवरी ||
गोपमुखे वृत्त कळे
झाले गांवकरी गोळा
शेगांवीच्या समर्थांचा
असे मी हो शिष्य भोळा ||
श्रींनी ऋतु नसतांना
आणविली वृक्षा फळे
पाने आणाविस तू ही
खरा शिष्य शीघ्र कळे ||
पितांबर धांवा करी
सद्गुरू समर्थांचा
धांव पाव गुरूनाथा
आला ‘पळ’ मरणाचा ||
आर्त भाव हा मनांत
घाली मनोभावे हांक
पाने फुटली वृक्षास
श्रींनी ऐकली ती भांक ||
गजानन महासंत
भावभक्ती नाण्यावरी
असे सदैव संतुष्ट
हेची सत्य खरोखरी |
©️®️
सौ.मंजिरी अनसिंगकर ,
नागपूर.