You are currently viewing रहाटेश्वर आणि मुटाट ग्रामपंचायत साठी ६ उमेदवारी अर्ज

रहाटेश्वर आणि मुटाट ग्रामपंचायत साठी ६ उमेदवारी अर्ज

देवगड

देवगड तालुक्यातील२३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा दुसऱ्या दिवशी सहा अर्ज दाखल झाले. रहाटेश्वर आणि मुटाट ग्रामपंचायत निवडणूकी साठी हे अर्ज दाखल झाले. देवगड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी मात्र सहा अर्ज दाखल झाले. यामध्ये रहाटेश्वर ग्रामपंचायती साठी पाच व मुटाट ग्रामपंचायती साठी एक अर्ज दाखल झाला. आँनलाईन अर्ज भरण्यासाठी देवगडमधील सायबर कँफेमध्ये उमेदवार व राजकीय पक्षांची गावागावातील नेतेमंडळीची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे। तालुक्यातील कातवण,टेंबवली, पाटथर, धालवली, कोर्ले, पाळेकरवाडी, गढीताम्हाणे, राहटेश्वर, मोंड, तांबळडेग, लिंगडाळ, मुणगे, मिठबांव, इळवे, कुणकेश्वर, वाड, मुटाट, नाडण, मोंडपार, वरेरी, तळवडे, पुरळ, शिरगांव या २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. २३ ग्रामपंचायतींचे एकूण ७१ प्रभाग असून १८९ सदस्य आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा