You are currently viewing “गाबीत समाजाच्या शिमगोत्सव” लोककलेला शासन मान्यता मिळावी

“गाबीत समाजाच्या शिमगोत्सव” लोककलेला शासन मान्यता मिळावी

जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर यांची मागणी

 

कणकवली :

पारंपारिक होळी सणाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बहुसंख्य गावातील गाबीत समाजाच्या वाड्यातून वेगळ्याप्रकारचा पासून शिमगोत्सव साजरा केला जातो.संभाजी महाराजांच्या काळा पासून परंपरागत चालत आलेल्या या लोककलेचा समावेश शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या लोककलाना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या योजनेत करावा अशी मागणी “गाबीत समाज सिंधूदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी केली आहे.

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ मुंबई,गाबीत समाज महाराष्ट्र ,गाबीत समाज सिंधुदुर्ग,आणि गाबीत समाज देवगड या संस्थांच्या वतीने सुमारे 22 गाबीत वाड्यात 2 दिवसांचा दौरा करून गाबीत शिमगोत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो याची माहिती समाज बांधवांकडून संकलित करण्यात आली आहे. हि लोककला जिवंत रहावी व तिचा प्रचार ब प्रसार व्हावा म्हणून गाबीत समाज महाराष्ट्र चे सरचिटणीस श्री.बाळा मणचेक्रर, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर, देवगड तालुका सचिव श्री.संजय बांदेकर, उपाध्यक्ष श्री.लक्ष्मण तारी, सुहास पराडकर, रमेश तारी, धर्मराज जोशी, डी. बी. कोयडे, धर्माजी पराडकर, धनंजय मणचेकर,बाळा मुणगेकर, प्रवीण सरवणकर, धर्माजी आडकर,श्री.जोशी, वगैरे पदाधिकाऱ्यांनी देवगड मधील 22 गाबीत वाड्यात जाऊन प्रत्यक्ष शिमगोत्सव कसा साजरा केला जातो त्याची माहिती व चित्रीकरण केले.

घुमट नृत्य, फाग,रोंबाट चे सादरीकरण यांचीही माहिती घेतली आहे. पूर्वांपार चालत आलेली हि लोककला अधिक समृध्द व्हावी तसेच राज्यातील इतर लोकांना त्याची महिती व्हावी.आणि दशावतारी नाट्य,लावणी, कळसूत्री बाहुल्या,गजा नृत्य,कापड खेळे, जाखडी नृत्य,नमन या प्रकारांप्रमाणे गाबीत शिमगोत्सव मधील लोककला प्रोत्साहन मिळावे,मानधन मिळावे ब कलाकारांना मानधन मिळावे,ज्येष्ठ कलावंतांना पेन्शन मिळावी.यासाठी गबित समाज संघटना प्रयत्न करणार आहे.

त्याचाच एक भाग म्हणून मे महिन्यात 24,25,26 मे मध्ये देवगड येथे शिमगोत्सव व गाबीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल.त्यादृष्टीने सर्व प्रकारचे प्रयत्न चालू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा