*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलाबस्तवन……छत्तीसावे…!!*
हुंगले मी जगाचे आवार
उगाच पुरलेस मला जमिनीत
कासावीस गंध बोलावतो मला
काय पाहायचे कस्तुरीस बेंबीत..
जिव्हाळ्याच्या बहरल्या अंगणात
झुकला सलोखा माझ्या दाराशी
उमलत्या ह्दयाची हाक ऐकून
ईश्वर साक्षात माझ्या घरापाशी
रोंधल्या श्वासांस लागली आस
कां शोधायला लावतोस ब्रम्हांडाची कास
मंत्रमुग्ध मोहक स्मित प्रेमसुधेत
गगनमंडपातून तू धरेवर आलास
पहाटेच्या आरतीत तू अवतरलास
सुंदरता भूवरती चराचरात पसरली
सुखसाजण श्रीरंग अंतरी विश्वव्यापी
रंगलावण्य लेऊन धरा उचंबळून आली
तुझ्या सौंदर्याने माझं अंगण बहरलं
नात्याची कृतज्ञता मी जपली
भावखुणांत प्रेमाचा भाव तुझा
प्रतिमा तुझी देव्हा-यात जाऊन बसली
बाबा ठाकूर धन्यवाद