You are currently viewing श्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन विजय ग्रंथ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

 

*श्री गजानन विजय ग्रंथ.*

अध्याय अकरावा

 

अकराव्या अध्यायात

कथा भास्कर भक्ताची

मृत्यु ओढवला त्याचा

गोष्ट कुत्रा चावण्याची ||

 

श्वान विषापासूनी हो

वाचवावे भास्कराला

भोग भोगल्यावाचूनी

नसे सुटका जीवाला ||

 

भास्कराने जमविले

भक्तगण समर्थांचे

“श्रींचे” स्मारक बांधावे

घेई वचन भक्तांचे ||

 

जन्म भास्कराचा धन्य

बाळाभाऊ आनंदला

संतसेवा झाली पूर्ण

मोक्ष पदाला पावला ||

 

अडगांवी भास्कराचे

पंचमी दिनी निर्वाण

हरहर शब्द”श्रींचा”

केले वैकुंठ प्रयाण ||

 

द्वारकेश्वरासन्नीध

सांगविधी भास्कराचा

दहा दिन अन्नदान

आशिर्वाद गरीबांचा ||

 

चिंचवृक्षातळी सर्व

भोजनास बसलेले

अन्न द्रोण नेती काक

सर्व लोकं हो त्रासले ||

 

हेतू प्रसाद मिळावा

भास्कराच्या भंडा-याचा

समर्थांची आज्ञा होता

त्याग केला त्या स्थळाचा ||

 

काक आज्ञेत वागले

जाणा सामर्थ्य हो “श्रींचे”

खेळ नसे संतत्चाचा

मर्म हेच अध्यायाचे ||

 

©️®️

सौ.मंजिरी अनसिंगकर

नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा