*गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादीत चमक*
बांदा
गुरूकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेच्या दहा विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत चमकदार कामगिरी केली.
जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेत शाळेतून ५०हून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या परीक्षेत इयत्ता चौथीतील दुर्वा दत्ताराम नाटेकर ही राज्यात अकरावी जिल्ह्यात तिसरी आली, तसेच चौथीतील स्वरा दिपक बांदेकर ही राज्यात एकविससावी व जिल्ह्यात सहावी आली. इयत्ता दुसरीतील श्रेया दत्ताराम परब ही राज्यात चौथी , वेदांत जीवबा वीर याने राज्यात पाचवा क्रमांक प्राप्त केला त्याबरोबर सान्वी भगवान झोरे,नीरज अमोघ सिध्दये, शुभ्रा सागर तेली, सदानंद सुर्यकांत केसरकर व खुशाल संतोष पवार,हर्ष नारायण निब्रे या विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा स्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मेडल व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे उपाध्यक्ष संपदा सिध्दये, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत , मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांनी अभिनंदन केले असून या विद्यार्थ्यांना पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी,रसिका मालवणकर,जे.डी.पाटील , शांताराम असनकर ,रंगनाथ परब, शुभेच्छा सावंत, मनिषा मोरे,सपना गायकवाड, जागृती धुरी,स्नेहा कदम, सुजाता सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.