“नृत्य सन्मान” पुरस्कार देऊन ६०० हून अधिक कलाकारांचा सन्मान…
कुडाळच्या चिमणी पाखर अकॅडमीचा पुढाकार; जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम…
कुडाळ
नृत्य निवेदन क्षेत्रात आपली चमक दाखवणाऱ्या अनेक नर्तक, निवेदक आणि बॅक स्टेज आर्टिस्ट अशा अनेक कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांच्या कलेचा गौरव करणारा सोहळा “चिमणी पाखरं” अकॅडमीच्या माध्यमातून संपन्न झाला. यावेळी एक-दोन नव्हे तर तब्बल ६०० हून अधिक कलाकारांना नृत्य सन्मान अवॉर्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच अशा पद्धतीचा उपक्रम राबविण्यात आल्यामुळे लहानापासून अगदी नावाजलेल्या कलाकाराच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली.
चिमणी पाखर डान्स अकॅडेमीचे अध्यक्ष रवी कुडाळकर आणि सल्लागार सुनील भोगटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले कलाकार आणि रसिक प्रेक्षकांनी भरलेल्या कुडाळच्या मराठा समाज सभागृहात काल हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी यावेळी रंगकर्मी केदार सामंत, केदार देसाई, साईनाथ जळवी, प्रणय तेली, अनंत जामसंडेकर, श्री. नाईक, श्री. पावसकर, चिमणी पाखरंचे सल्लागार सुनील भोगटे, अध्यक्ष रवी कुडाळकर, अमोल टेंबकर उपस्थित होते.
यावेळी सामंत यांनी चिमणी पाखरं डान्स अकादमीच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील कलाकाराणा एकत्रित करून त्यांचा सन्मान करण्याची चिमणी पाखरं संस्थेची हि संकल्पना खुरूप चांगली असल्याचे श्री. सामंत म्हणाले.
पुढच्या वर्षी या पुरस्कार सोहळ्याचे स्वरूप थोडे वेगळे असेल असे सुनील भोगटे यांनी सांगितले. यंदा तब्बल सहाशे कलाकारांनी नोंदणी केली होती. पण पुढच्यावर्षी नॉमिनेशन पद्धत राबवण्यात येऊन ज्युरी द्वारे कलाकार निवडण्यात येतील असे श्री. भोगटे यांनी सांगितले.
यावेळी प्रणय तेली, केदार सामंत, केदार देसाई,अनंत जामसंडेकर, साईनाथ जळवी यांनी देखील आपले विचार व्यक्त करून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन रवी कुडाळकर यांनी केले.