You are currently viewing दोडामार्ग येथील दागिने चोरी प्रकरणी चोरट्यांना पकडण्यात यश…

दोडामार्ग येथील दागिने चोरी प्रकरणी चोरट्यांना पकडण्यात यश…

दोडामार्ग येथील दागिने चोरी प्रकरणी चोरट्यांना पकडण्यात यश…

दोडामार्ग

दोडामार्ग येथे रविवारी दि २४ मार्च रोजी मांगेली येथील रसिका गवस हिचे दोडामार्ग बाजारपेठेत जान्हवी बेबी केअरच्या समोर दागिने चोरीस गेले होते.
दरम्यान या प्रकरणातील संशयितांच्या मुसक्या आवळण्यात दोडामार्ग पोलिसांना यश आले आहे. रामेश्वर केशव म्हाळसेकर (रा.पर्ये, साखळी,गोवा) याला होंडा येथून मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. आयी येथे टाकलेली चोरीतील टुरिस्ट बॅगही जप्त करण्यात आली. याप्रकरणी सोन्याची तीन ग्रॅमची कर्णफुले व १५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल संशयीताकडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोडामार्ग महिला पोलीस हवालदार डिसोझा यांना गोपनीय सूत्रांकडून चोरी प्रकरणातील संशयित होंडा गोवा येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह पोलीस शिपाई विजय जाधव व अन्य दोन कर्मचाऱ्यांनी होंडा येथून चोरट्याला ताब्यात घेतले.दोडामार्ग पोलिसांनी पाच दिवसातच या चोरी प्रकरणाचा तपास करण्यात यश मिळविले.

प्रतिक्रिया व्यक्त करा