– उपायुक्त प्रमोद जाधव
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका व व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रीयेमुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कार्यालय, सिंधुदुर्ग येथील इतर दिवशी संभाव्य गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, सिंधुदुर्ग हे दिनांक 25,26 व 27 डिसेंबर 2020 या शासकीय सुट्टीच्या दिवशीही सुरु राहील. अशी माहिती, जिल्हा जात प्रमाणपत्र पडाळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव यांनी दिली.
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिक दिनांक 30 डिसेंबर 2020 आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रीया चालू आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात समिती कार्यालयात विद्यार्थी व निवडणूकीचे उमेदवार यांची गर्दी होण्याची शैता नाकारता येणार नाही. समिती कार्यालयात अपुरे मनुष्यबळ आहे. सद्या कोवीड-19 च्या महामारीची परिस्थिती भेडसावत आहे. अशा वेळी अभ्यागतांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोवीड-19 चा प्रभाव वाढणार नाही. यास्तव शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी कार्यालय सुरु ठेवून निवडणूकीचे व विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रस्ताव स्विकारण्यात येतील.तरी निवडणूकीसाठी व व्यावयायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणीचे प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडाळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव यांनी केले आहे.