You are currently viewing स्मृति भाग ६०

स्मृति भाग ६०

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ६०*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आता अन्य सूतकी कोण असतो ? ते पाहू .

 

*अस्नात्वा चाप्यहुत्वा च भुङ्क्तेSदत्त्वा च यः पुनः ।*

*एवंविधस्य सर्वस्य सूतकं समुदाहृतम् ।*

जो मनुष्य स्नान केल्याशिवाय , हवन केल्याशिवाय आणि दान दिल्याशिवाय जेवण करतो , अशा व्यक्तीस सूतक सांगितले आहे !

 

*व्याधिस्तस्य कदर्य्यस्य ऋणग्रस्तस्य सर्वदा ।*

*क्रियाहीनस्य मूर्खस्य स्त्रीजितस्य विशेषतः॥*

*व्यसनासक्तचित्तस्य पराधीनस्य नित्यशः ।*

*श्रद्धात्यागविहीनस्य भस्मान्तं सूतकं भवेत् ॥*

रोगी , ऋणग्रस्त ( कर्जबाजारी ) , क्रियांनी हीन वा कर्महीन , मूर्ख , सदा स्त्रीचे वशात रहाणारा , सतत व्यसनात आसक्त चित्त असणारा , नित्प पराधीन , श्रद्धा आणि त्यागाने हीन असणारा मनुष्य , हे सर्व भस्मान्तापर्यंत सूतकी असतात .

ज्यांना सूतक असते त्यांचेशी केला जाणारा व्यवहार ” दो गज दूरी ” चा असतो . स्पर्श करायचा नसतो . त्यांचे भांडे कपडे वेगळे ! त्यांच्या वस्तू नियमित वापरात घ्यायच्या नसतात ! बरीच काळजीपूर्वक व्यवहार असतात ! आणि वरील वर्णनाचे साल ही अपल्यास माहीत नाही ! जे आज ही लागू पडते !! किती विचारी असतील आमचे पूर्वज ? आणि आम्ही जर त्यांची आठवण न काढता — पुराणातली वांगी पुराणात ! इ. म्हणींनी त्यांना विसरत असू तर आमच्यासारखे कृतघ्न आम्हीच ? आणि ही कृतघ्नता शिकवणारांना काय आणि कसे धडे शिकवावे ? शत्रू बलवान असेल तर एकसंघताच उपाय आहे ना ?

 

*यज्ञकाले विवाहे च देशभङ्गे तथैव च ।*

*हूयमाने तथाग्नौ च नाशौचं मृतसूतके ॥*

यज्ञ सुरु असेल , विवाह सुरु असेल , देशावर भयंकर मोठी देशव्यापी आपत्ती असेल तर मृत्यु व जन्माचे शौच नसते .

 

*स्वस्थकाले त्विदं सर्वमशौचं परिकीर्तितम् ।*

*आपद्रतस्य सर्वस्य सूतके न तु सूतकम् ॥*

हे सगळे अशौच स्वस्थकाळी पाळावे . आपत्काळी सूतक असून नसते .

केवढे सूक्ष्म व स्पष्ट सूचन प्रजापतिंनी केले आहे . विशेष समजावण्याची गरजच नाही . पुढचा अध्याय योगाबद्दल येतो . तो उद्या पाहू .

आज थांबतो . तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा