You are currently viewing खेळे शिमग्याचे

खेळे शिमग्याचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी प्रा.सत्यवान घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*खेळे शिमग्याचे*

*************

 

राधा -कृष्ण खेळात शिरोमणी

खेळे येती शिमग्याला अंगणी।।धृ।।

 

घरोघरी येऊन गाणी गाती

साऱ्या जनांना रिझवून जाती

घालती शिमग्याची ते गाह्राणी

खेळे येती शिमग्याला अंगणी।।धृ।।१।।

 

विविध सोंगे घेती खेळकरी

आनंद भरती जना अंतरी

शोभा येई नाचाच्या रिंगणी

खेळे येती शिमग्याला अंगणी।।धृ।।२।।

 

गावगावचे सारे खेळे येती

गोप- टिपरीचा खेळ खेळती

राधा- कृष्णाची करती ओवाळणी

खेळे येती शिमग्याला अंगणी।।धृ।।३।।

 

सर्व सणात सण हा वेगळा

दानधर्माचा दिवस निराळा

पोस्ता मागती शिमग्याच्या सणी

खेळे येती शिमग्याला अंगणी।।धृ।।४।।

 

*********************************

*रचनाकार:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.

*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.

*दिवा:-* ठाणे.

🌺🌸🌺🌸🌺🦚🌺🌸🌺🌸🌺

प्रतिक्रिया व्यक्त करा