*सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी (शरद पवार) महिला अध्यक्षपदी सौ. नितेशा नाईक*
सावंतवाडी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने सौ.नितेशा नाईक यांना सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांच्या हस्ते सदर नियुक्तीचे पत्र सौ.नितेशा यांना प्रदान केले. यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्ष रेवती राणे सावंतवाडी शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी उपस्थित होत्या. सौ. नितेशा नाईक या न्हावेली गावातील सामाजिक कार्यकर्ते कै. चंद्रकांत नाईक यांच्या सुकन्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक, राजकिय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेत सौ.नितेशा नाईक यांची निवड करण्यात आली.यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम सौ.अर्चनाताई घारे-परब यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने करण्याचा विश्वास सौ.नितेशा यांनी अर्चनाताई यांना दिला तर त्यांचे वडील आदरणीय चंद्रकांत नाईक यांनी देखील त्यांच्या राजकीय जीवनप्रवासात काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून निस्वार्थीपणे संघटन वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायम मेहनत घेतली आणि सामाजिक व राजकीय जबाबदारीचे भान ठेवून काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम केले अशा भावना सौ.नितेशा नाईक यांनी व्यक्त केल्या.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सौ.नाईक प्रामाणिकपणे काम करतील असा विश्वास सौ.अर्चनाताई घारे परब यांनी दाखवला व त्यांना शुभेच्छा दिल्या.