You are currently viewing २७ मार्च रोजी दाणोली साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा

२७ मार्च रोजी दाणोली साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा

सावंतवाडी :

 

२७ मार्च रोजी दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा होत आहे. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिर आणि निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गोवा, बेळगाव परिसरातून भाविकांची अलोट गर्दी होते.

यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ४.३० वाजता काकड आरती, सकाळी ५ वाजता अभ्यंगस्नान, सकाळी ७ वाजता झाराप येथील श्री बोभाटे बुवा यांचे सुश्राव्य कीर्तन, सकाळी ८ वाजता सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्याहस्ते साटम महाराज समाधी पूजन व विधिवत पाद्यपूजा त्यानंतर श्री घाटकर कोलगाव यांचे बासरी वादन, सकाळी ९ वाजता झाराप येथील बुवा संदेश सामंत यांचे सुश्राव्य भजन, सकाळी दहा वाजता पिंगुळी येथील ह भ प वासुदेव सडवेलकर यांचे सुश्राव्य किर्तन, दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १२.३० वाजता राधाकृष्ण संगीत साधना च्या संचालिका सौ विणाताई दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अभंग व भक्ती गीतांचा सुरेख नजराणा, दुपारी १ वाजल्यापासून अखंड महाप्रसादाला प्रारंभ, दुपारी २ वाजता कलंबिस्त येथील बुवा अंकुश सांगेलकर यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी ३ वाजता मुंबई येथील बुवा संदीप वाळके यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी ४ वाजता पुणे येथील ह भ प नातू व त्यांचे सहकारी यांचे सुश्राव्य किर्तन, सायंकाळी ७ वाजता महाआरती, सायंकाळी ७.३० वाजता साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रात्री ८ वाजता सवाद्य पालखी मिरवणूकीला प्रारंभ होणार असून त्यानंतर मध्यरात्री १ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार मंडळाचा (चेंदवण) ‘ब्रह्म पदार्थ अर्थात महिमा जगन्नाथ पुरीचा’ हा ट्रिक्ससियुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.

भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत तथा श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त खेम सावंत भोसले यानी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा