जिल्हास्तरीय ‘ज्ञानी मी होणार’ स्पर्धेत हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळेचे यश
सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय ‘ज्ञानी मी होणार’ स्पर्धेत हरकुळ खुर्द गावडेवाडी या शाळेने विजेतेपद पटकाविले. सिंधुदुर्गनगरी येथे बाल कला क्रीडा आणि ‘ज्ञान मी होणार’ सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय ज्ञानी मी होणार स्पर्धा झाली. या स्पर्धेतील प्रथम फेरीत शाळा हरकूळ खुर्द गावडेवाडी इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी कु.अर्णव भिसे व संचित सावंत यांनी 100 पैकी 80 गुण मिळवत टाय फेरीत विजय मिळवला. अटीतटीच्या लढतीत या प्रशालेने विजेतेपद पटकावले या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षणाधिकारी मा. श्री.गणपती कमळकर, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, केंद्रप्रमुख शांताराम सावंत यांनी मुलांचे कौतुक केले. सर्व क्षेत्रातून या यशाचे कौतुक होत आहे.