दत्ताराम विष्णू गावकर, मनसे – जिल्हा उपाध्यक्ष सिंधुदुर्ग याच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग एक्सप्रेस काव्यमंच आयोजित राज्यस्तरीय खुली काव्यलेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
ही स्पर्धा गावकर यांच्या वाढदिवसानिमित्त १८ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात आली होती. त्यांनी विजेत्यांना रोख रक्कम बक्षिसे दिली
विषय- नागरिक मी देशाचा (अष्टाक्षरी काव्य स्पर्धा )
प्रथम – कवी निलेश पाऱ्हाटे (शिरूर – पुणे)१००१रु. व सन्मानपत्र द्वितीय – कवी चिंतामणी लक्ष्मण पावसे दापोली (रत्नागिरी)७०१रु. व सन्मानपत्र तृतीय – श्री सुनील विठ्ठल गोंधळी (कोल्हापूर)
५०१रु. व सन्मानपत्र ,उत्तेजनार्थ – कु. निनाद मलजी राऊळ (सिंधुदुर्ग)२०१रु. व सन्मानपत्र
उत्तेजनार्थ- श्रीकांत गजानन राणे (गिरोडे -सिंधुदुर्ग )२०१रु. व सन्मानपत्र
उत्तेजनार्थ – गणेश प्रकाश पाताडे(देवगड -सिंधुदुर्ग )२०१रु. व सन्मानपत्र यांना ऑनलाईन रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण संत साहित्यअभ्यासक, कीर्तनकार, कवी, लेखक, गायक व शिक्षक यांनी उकृष्टपणे केले.
कोरोना काळात दोडामार्ग एक्सप्रेस मंचने विविध राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय खुल्या व शालेय विध्यार्थ्यासाठी अनेक स्पर्धाचे आयोजन केले. त्याचप्रमाणे विविध समाजपोयोगी कार्य करून आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे.
सर्व सहभागी स्पर्धक व सर्व विजेत्या स्पर्धकांचे दोडामार्ग एक्सप्रेस काव्यमंचाच्यावतीने संस्थापक मनोज माळकर, संयोजक संदीप सुरेश सावंत व संकल्पक श्रीकांत राणे यांनी मनापासून आभार व्यक्त केले.