You are currently viewing होळी

होळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम मधुसिंधू काव्यरचना*

 

*होळी*

 

होळीचा सण

उत्साह वाटतो

आनंद दाटतो

चैतन्य क्षण।।१

 

सुका पाचोळा

लाकडे गोव-या

होलिकेस ब-या

करून गोळा।।२

 

बत्तासे गाठी

पोळी पुरणाची

करू नैवेद्याची

होलिकेसाठी।।३

 

फुले पळस

रंग केसरिया

राधा कृष्णप्रिया

प्रीत राजस।।४

 

फांदी तोडून

नको वृक्ष नाश

टाळावा विनाश

विवेकातून।।५

 

द्वेष सरूनी

स्नेह वृध्दिंगत

प्रेमाची रंगत

मैत्र स्मरुनी।।६

 

✨✨✨✨✨✨✨

अरुणा दुद्दलवार@✍️

दिग्रस…यवतमाळ

प्रतिक्रिया व्यक्त करा