*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जागतिक कविता दिन….*
कविता माझी येई अचानक ,
काळजाच्या त्या गाभ्यातुन …
अलगद कोमल शब्दछटातुन …
भावनेच्या शब्द झऱ्यातुन….
कधी असते ती कल्पना भरारी..
कधी ती देते दुःख वेदना उरी..
कधी ती असते हसरी साजरी..
तर कधी उमटे व्यथेतून खरी!
मनीच्या गर्भी रुजून रहाते…
चैतन्यावर ते बीज पोसते…
अंकुरे जेव्हा मनात तेव्हा…
इवल्याशा रोपात बहरते !
जशी उमलते , तशीच फुलते..
कविता जगी अशीच जन्मते..
मी न कधी ती सांगू शकते..
कविता मज ती कशी स्फुरते !
उज्वला सहस्रबुद्धे