दोडामार्ग :
मोर्ले केर भागातून हत्तीचा धुडगूस आता पाळये गावात सूरु झाला आहे. आज सकाळीच फळ बागेतील केळीची नासधूस करत घरालागत असलेल्या फणसाच्या झाडांवर हत्तींनी मोर्चा वळवला आहे. आता घरांलागत असलेल्या बागायातीत हत्तीचा दिवसा वावर वाढला आहे. त्यामुळे काजू हंगाम सुरू असल्याने हत्तीच्या सुटकेसाठी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. वारंवार मागणी करूनही वन विभाग दुर्लक्षित करत आहे. त्यामुळे हत्तीचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मोर्ले हेवाळे नंतर आता पाळये गावात गेल्या दोन दिवसांपासुन टस्कर हत्तीची दहशत असल्याने परिसरातील ग्रामस्थ आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.