You are currently viewing मिलाग्रिस प्रशालेमध्ये आर्ट व क्राफ्ट प्रदर्शनाचे आयोजन…

मिलाग्रिस प्रशालेमध्ये आर्ट व क्राफ्ट प्रदर्शनाचे आयोजन…

मिलाग्रिस प्रशालेमध्ये आर्ट व क्राफ्ट प्रदर्शनाचे आयोजन…

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील मिलाग्रिस प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या अभिनव संकल्पनेतून चित्रकला व कार्यानुभव च्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सावंतवाडी तालुक्यातील तहसीलदार सन्माननीय मोनिका कांबळे मॅडम उपस्थित होत्या.

सर्वप्रथम प्रशालाचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय मोनिका कांबळे मॅडम यांनी आपल्या शुभहस्ते केले. या प्रदर्शनामध्ये चित्रकला व कार्यानुभव चे विविध प्रकारचे नमुने पाहायला मिळाले. मिलाग्रिसचा पूर्ण परिसर विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने बहरुन गेला होता. तहसीलदार मॅडमनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले तसेच सर्व विद्यार्थ्यांशी मैत्री रूपात संवादही साधला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बाल चित्रकार पुरस्कार प्राप्त प्रशालेची विद्यार्थिनी प्रिया देसाई हिने आपण काढलेल्या चित्राची फ्रेम कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कांबळे मॅडम यांना भेट म्हणून दिली. त्यानंतर प्रशराचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सुद्धा कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनासाठी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या शिक्षिका सौ. उर्मिला मेनिंजीस यांनी केले तर आभार सौ.रोझा फर्नांडिस यांनी मानले.

WhatsApp Facebook

प्रतिक्रिया व्यक्त करा