You are currently viewing ‘कोरोना’ रोखण्यासाठी लोकांचा विचार व्हावा

‘कोरोना’ रोखण्यासाठी लोकांचा विचार व्हावा

कोरोना’ रोखण्यासाठी लोकांचा विचार व्हावा –  समीर नलावडे

कणकवली / प्रतिनिधी :-

‘करोना’ व्हायरस’चा जिल्ह्यात वाढत असलेल्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. कोरोना संक्रमणाची ही साखळी तोडण्यासाठी काही महिन्यांपूर्वी वापरलेल्या ‘लॉकडाउन’च्या पर्यायचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे. असे मत कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केले आहे. नलावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. ‘कोरोना’च्या विरोधात लढा देत असताना जिल्ह्यात वाढत असणारा ‘कोरोना’चा आलेख खाली येण्याचे नाव घेत नाही. कणकवली तालुक्यातही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे समूहसंसर्ग वाढीस लागण्याची भीती आहे. यामुळे समूहसंसर्ग वाढीस लागणंयाची भीती आहे. पण, समूह संसर्ग वाढीस लागू नये, म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात अआलेले चाकरमानी व स्थानिक नागरिक यांच्यातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरते आहे. या सार्‍याचा गांभीर्याने विचार करत जिल्ह्यात पसरणारी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. ‘कोरोना व्हायरस’ची साखळी तोडण्यासाठी यापूर्वी जिल्ह्यात ‘लाँकडाऊन’ जाहीर करण्यात आले होते. त्यात धर्तीवर पुन्हा एकदा ‘लाँकडाऊन’चा पर्याय वापरून जिल्ह्यात पसरणारा समूह संसर्ग वेळीच रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजनांची गरज आहे, असेही नलावडे यांनी म्हटले आहे‌.

प्रतिक्रिया व्यक्त करा