You are currently viewing जि. प. केंद्रशाळा मसुरे नं. १ मालवणच्या बालचमुंनी घेतला क्षेत्रभेटीचा अनुभव

जि. प. केंद्रशाळा मसुरे नं. १ मालवणच्या बालचमुंनी घेतला क्षेत्रभेटीचा अनुभव

मालवण :

 

क्षेत्रभेट हा एक शालेय जीवनातील कार्यक्रम आहे, यालाच शालेय सहल किंवा शैक्षणिक सहल देखील म्हणतात. क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या क्षेत्राला भेट देणे होय. उदाहरणार्थ आपण सहलीला विविध ठिकाणी प्रवास करणे आणि नवनवीन ठिकाणांना भेट देणे हा आपल्या जीवनातीलच एक भाग आहे. कोणत्याही प्रवासातील सर्वात महत्वाचं घटक म्हणजे क्षेत्रभेट. क्षेत्रभेट म्हणजे एका व्यक्तीने अथवा व्यक्तींच्या समूहाने, ठराविक क्षेत्राला भेट देऊन, त्या क्षेत्राचा आढावा घेणे होय. शैक्षणिक क्षेत्रात क्षेत्रभेट म्हणजे वर्गा बाहेरील कोणत्याही ठराविक क्षेत्राला भेट देणे होय. या अनुषंगाने मुलांना क्षेत्रभेटीचा अनुभव यावा म्हणून जिल्हा परिषद केंद्रशाळा मसुरे नं. १ मालवण च्या मुलांनी मसुरे येथे घेतला, क्षेत्रभेटीचा अनुभव.

क्षेत्रभेट म्हणजे शाळेद्वारे आयोजित करण्यात आलेली सहल, ज्यात शाळेद्वारे विद्यार्थ्यांना घेऊन क्षेत्रभेट केली जाते. ज्याचा एकच मुख्य उद्देश असतो. तो म्हणजे भारतीय संस्कृतीचा परिचय, संस्कृतीचे महत्व, निसर्गाचा शोध, नवनवीन जीवनशैली आणि भाषेचे आकर्षण, विद्यार्थाना पटवून देणे. अशा या उपक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव दरवर्षी प्रमाणे इयत्ता पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्याची क्षेत्र भेट गडघेरावाडीतील शिंगरे यांच्या भाजीपाला, कलिंगड मळ्यामध्ये मुलांना घेता आला. शेतात झाडावरून तोडून लगेच खाल्लेल्या या फळांना काहीतरी विलक्षण चव लागते. बाजारातून कितीही ताजी म्हणून आणलेल्या फळांना तशी चव कधी लागूच शकत नाही. एकदा असं शेतात जाऊन खायचा आस्वाद घ्या. भाजीपाला लागवड कशी होती कोणत्या झाडाचं काय नाव आहे? कोणत्या झाडाला काय म्हणतात ? विविध भाजी कशी असते ? हे सर्व अनुभव बाल विद्यार्थ्यांना अनुभवले.

शिवाय लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्या माणसांसाठी सुद्धा ही एक चवदार आणि शैक्षणिक अशी ट्रीप होईल. कारण कित्येकवेळा आपण झाडं, फळं, भाज्या याबद्दल शाळेत शिकलेलो असतो पण एकतर त्यातल्या अर्ध्या गोष्टी विसरलेल्या असतात आणि अशाप्रकारे प्रत्यक्ष तर कधी बघितलेल्याच नसतात. त्यामुळे सुमधुर चव, ताजेपणा, रसरशीतपणा केंद्रशाळा मसुरे नं. १ च्या इ.१ली, २री तील विद्यार्थ्यांनी शिंगरे यांच्या शेतमळ्याला स्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी घेतला आगळावेगळा अनुभव घेतला. यावेळी सौ.मयुरी शिंगरे यांना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारुन माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी गाणी म्हणत आनंद घेतला शिंगरे कुटुंबियांकडून मुलांना कलिंगड खायला दिली. या क्षेत्रभेटीत दांडी शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. शिवराज सावंत, सौ.ज्योती पेडणेकर,  सौ.कोमल शिंगरे, सौ. सायली दुखंडे, महादेव शिंगरे, सौ.मयुरी शिंगरे सौ, लावण्या शिंगरे, नंददिपक साटम, लक्ष्मण शिंगरे, श्री.तोंडवळकर, श्री.मुळये, नेहा शिंगरे आदीजण सहभागी झाले होते. तर या उपक्रमात मुख्याध्यापक सौ शर्वरी सावंत, गोपाळ गावडे, रामेश्वरी मगर, सोनाली राऊत, शिफा शेख यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे माजी सरपंच सौ.लक्ष्मी पेडणेकर, पत्रकार श्री.दत्तप्रसाद पेडणेकर, शा.व्.स.अध्यक्षा. सौ.शितल मसुरकर,  उपाध्यक्ष श्री.संतोष दुखंडे, शिक्षणप्रेमी श्री.सन्मेश मसुरेकर व सर्व सदस्या यांनी विशेष कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा