शेवटच्या ४८ तासात उमेदवार जाहीर झाला तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून महायुतीचाच उमेदवार निवडून येईल – आमदार नितेश राणे
कणकवली
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा लढविण्या बाबत चर्चा होत आहे.महायुतीचे नेते त्यावर निर्णय घेत आहेत.उशीर होत असला तरी शेवटच्या ४८ तासात उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ असताना जरी उमेदवार जाहीर झाला.तरी महायुतीचा च उमेदवार निवडून येईल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. विनायक राऊत यांची रिटर्न तिकीट कडूनच ठेवलेली आहे अशी टीका केली.मोदींनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी दिला आहे.
मोदींची औरंगजेब सोबत तुलना करन म्हणजे देशभरातील नागरिकांचा अपमान करणे आहे जी धार्मिक स्थळ काँग्रेसच्या काळात अंधारात होती. त्यांना उजेडात आणण्याच काम मोदी साहेबांनी केलय.
राज ठाकरेंना युती मध्ये यायचं असेल तर सकारात्मक काही गोष्टींना आकार देणे गरजेचे आहे.त्यासाठी ही बैठक आहे. स्वागतार्ह आहे.
राहुल गांधीना किती वेळा लॉन्च करायचं ते आपल्या पायावर उभे राहणार नाहीत. त्यांची मशीन बंद पडली आहे.अशी टीका प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केली तरी खरीच आहे.
नवीन मतदार हे भारताची खरी ओळख आहेत. 10 वर्षात झालेले बदल पाहून त्यांनी मतदानासाठी भाग घ्यावा. मोदींना पंतप्रधान म्हणून निवडून देण्यासाठी हा नाव मतदार पूर्णतः मतदान करेल असा विश्वास यावेळी आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.