You are currently viewing चिमणी

चिमणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार यांनी २० मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*

 

*चिमणी*

 

तू चिमणी
तुझी चिवचिवं
इवला इवलासा गं
आहे तुझा जीवं

आकाशी उडते
फांदीवर बसते
इकडून तिकडे
लपंडाव खेळते

इवले इवले पंख तुझे
इवली इवली चोच
निर्मळ मन तुझे
देह निर्मळ तोच

शेतातील कणसातून
दाणे रोज टिपते
एक एक दाणा तू
पिलांना भरवते

चार काड्या वेचते
खोपा घरटे बांधते
तू छोट्या पिल्लांचा
छान सांभाळ करते

भुर्रकन उडते
खाली वर करते
दाणा पाणी शोधण्या
नभी घिरट्या घालते

स्वच्छंदी विहार
पंखामधे जोर
सोबतीला चिमणा
नाही कसला घोर

तू चिमणी
तुझी चिवचिव
मंजूळ तुझी गं..
चिवं…चिवं… चिवं…चिवं….

कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर ,धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा