You are currently viewing प्रशांत चिपकर यांना ‘नॅशनल लेवल एज्युकेशनल इनोव्हेशन अवॉर्ड’

प्रशांत चिपकर यांना ‘नॅशनल लेवल एज्युकेशनल इनोव्हेशन अवॉर्ड’

वेंगुर्ले:

सर फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय स्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2023 मध्ये दाभोली नं 2 चे पदवीधर शिक्षक श्री प्रशांत भालचंद्र चिपकर यांच्या ‘आवडीचे डोही आनंद तरंग, कलेचा व्यसन करी मोबाईल व्यसनाधीनता भंग ‘ या नवोपक्रमाची निवड राष्ट्रीय स्तरावर झाल्याने त्यांना नॅशनल लेवल एज्युकेशनल इनोवेशन अवॉर्ड 2023 ने सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्काराची घोषणा सर फाउंडेशन महाराष्ट्राचे राज्य समन्वयक श्री सिद्धराम माशाळे, श्री बाबासाहेब वाघ आणि महिला राज्य समन्वय श्रीमती हेमा शिंदे, आयटी विभाग प्रमुख राजकिरण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. सर इनोवेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने सन 2023 मध्ये देशभरातील प्रयोगाशील शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नवोन्मेष या प्रकल्पांतर्गत हे अवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर तज्ञ कमिटीमार्फत ही निवड केली आहे. सर फाउंडेशन ने शिक्षण विषयक अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत. रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल एज्युकेशन भारतीय प्रबंध संस्था (आय आय एम) अहमदाबाद, हनी बी नेटवर्क, सृष्टी अहमदाबाद, डाएट व शालेय शिक्षण विभाग यांच्यासोबत विविध उपक्रम प्राथमिक शिक्षणासाठी राबवले आहेत. या पुरस्काराचे वितरण मे 2024 मध्ये राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विशेष एज्युकेशनल इनोवेशन कॉन्फरन्स मध्ये होईल.यामध्ये शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच यामध्ये शिक्षण तज्ञांचे व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. श्री प्रशांत भालचंद्र चिपकर यांनी राष्ट्रीय स्तरावरील मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा