You are currently viewing बोलबच्चन पलीकडे जठार यांचे काम नाही – रूपेश राऊळ

बोलबच्चन पलीकडे जठार यांचे काम नाही – रूपेश राऊळ

सावंतवाडी :

 

माजी आमदार प्रमोद जठार राणे यांचा मुखवटा पांघरून आपलं घोडं दमटवित आहेत. मात्र जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या कामाचे स्वरूप लेखाजोखा मध्ये मांडले आहे. त्यामुळे उघडा डोळे बघा नीट असा सल्ला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला आहे.

माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत खासदार विनायक राऊत यांनी बीएसएनएल टॉवर आणले हे मान्य केले आहे त्याबद्दल जठार यांना धन्यवाद देतो असे त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. ग्राहकांपर्यंत मोबाईल रेंज पोहचली पाहिजे म्हणून खासदार विनायक राऊत यांनी मोठ्या प्रमाणात टाॅवर उभे राहिले पाहिजे म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून टाॅवर उभे केले. दळणवळणाचे साधन म्हणून मोबाईल आज महत्त्वाचा ठरतो असे राऊळ यांनी सांगितले.

प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांचा मुखवटा पांघरून आपलं टुणटूने वाजवायला सुरुवात केली असली तरी सिंधुदुर्गातली जनता यांना चांगलीच ओळखून आहे म्हणून त्यांना माजी आमदार करून घरी बसवलं. बोलबच्चन पलीकडे जठार यांचे काम नाही त्यामुळे खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्पाला भूमिपुत्र, बागायतदार शेतकरी यांनी विरोध केला. त्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मागे खासदार राऊत उभे राहिले याचा राग जठार यांच्या मनात खदखदत आहे. त्यामुळे ते पोपटासारखे बोलत आहे असे रूपेश राऊळ यांनी सांगितले.

गोरगरीब जनतेला आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल असे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विरोध होवूनही खासदार विनायक राऊत यांनी खेचून आणले आहे हे सत्य सांगायला प्रमोद जठार यांची जीभ कचरत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला हरेक प्रकारे विरोध करणारे कोण होते हे जनतेला माहिती आहे. मात्र खासदार विनायक राऊत गोरगरिबांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी खासदार म्हणून लोकसभेत आवाज उठवला हे जनतेला माहिती आहे असे राऊळ यांनी सांगितले.

खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करण्यासाठी भाजपकडे मुद्दे नाहीत. प्रचंड महागाई, मुंबई गोवा महामार्ग पुर्ण होण्यास लागलेला वेळ, गॅस सिलिंडर महागाई, पेट्रोल डिझेल महागाई, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय, काजू हमीभाव बाबतीत गोरगरीब जनता शेतकरी बागायतदार नाराजी आहे. या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत म्हणून भाजप खासदार विनायक राऊत यांच्यावर वैयक्तिक टिका टिप्पण्या करत आहेत. या भूलथापांना जनता बळी पडणार नाही असे रूपेश राऊळ म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा