समर्थच्या पालक व नातेवाईकांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी
बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने बालक समर्थ वय 8 वर्ष 5 महिने यास शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बाल गृह, सिंधुदुर्ग, ओरोस येथे काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आले आहे. तरी समर्थ याचे पालक व नातेवाईकानी 30 दिवसाच्या आत नामे संस्था शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बाल गृह सिंधुदुर्ग ओरोस फोन नं 9673734455 या नंबर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.
अन्यथा समर्थ याची जबाबदारी घेण्यास कोणीही नाही असे समजून बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार समर्थ याचे कायमचे पुनर्वसन करण्यास पूर्ण मोकळी राहील. संपर्कासाठी शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बाल गृह सिंधुदुर्ग,ओरोस 416812 फोन नंबर 9673734455, बाल कल्याण समिती, पत्ता शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बाल गृह सिंधुदुर्ग ओरोस , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय प्रशासकीय इमार तळमजला 02362 228869 येथे संपर्क साधावा.