You are currently viewing खानोली कोंडुरा ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू…

खानोली कोंडुरा ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू…

खानोली कोंडुरा ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू…

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुक्यातील खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची तसेच हे अतिक्रमण हटविण्यास हेतुपुरस्कर टाळाटाळ करणाऱ्या समितीवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी कोंडुरावाडी वायंगणी ग्रामस्थांनी आजपासून (१८ मार्च) जिल्हा परिषद समोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या ग्रामीण मार्गावर अतिक्रमण करून काहींनी अडथळा निर्माण केला आहे. या अडथळ्यामुळे येथील ग्रामस्थाना अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने या रस्त्यावरील अतिक्रमण हटावे यासाठी वायंगणी कोंडुरावाडी येथील ग्रामस्थांनी २६ जानेवारी रोजी पंचायत समिती वेंगुर्ला येथे उपोषण केले होते. यावेळी गट विकास अधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, शाखा अभियंता पंचायत समिती वेंगुर्ला यांची समिती गठीत करण्यात आली असून ही समिती अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिल्याने कोंडूरावाडी येथील ग्रामस्थांनी आपले उपोषण स्थगित केले होते. मात्र आता मार्च महिना संपत आला तरी अतिक्रमण हटविले जात नसल्याने अतिक्रमण हटविण्यासाठी गठीत करण्यात आलेली समिती अतिक्रमण हटविण्यासाठी हेतूपुरस्कर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप या गरमस्थानी केला आहे. तसेच या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची तसेच हे अतिक्रमण हटविण्यास हेतुपुरस्कर टाळाटाळ करणाऱ्या समितीवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी कोंडुरावाडी वायंगणी ग्रामस्थांनी आजपासून (१८ मार्च) जिल्हा परिषद समोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी रामकृष्ण पेडणेकर, यशवंत पेडणेकर, बाबुराव मुणनकर, रघुनाथ मुननकर आदी उपस्थित होते

 

प्रतिक्रिया व्यक्त करा