*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे अध्यक्ष कवी श्री.पांडुरंग कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*लिहिता लिहिता*
लिहिते व्हावे! आनंदी रहावे!!
चित्ती असू द्यावे! समाधान !!1!!
लिहिताना कधी! समाधीत जावे!!
इतुके असावे! लीन त्यात !!2!!
चिंतन मनन! करुनी लिहावे!!
फक्त शब्दालय! नसावे ते !!3!!
प्रबोधन व्हावे! मनासी भिडावे!!
असे ते लिखाण! असावे जी !!4!!
कधी क्रांतिकारी! कधी लाडीगोडी!!
कधीही जिव्हारी! लागो नये !!5!!
*पांडुरंग वसंत कुलकर्णी नाशिक*