*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*
*संत तुकाराम महाराज*
सुख दुःख आले | जया नसे खंत
तोच असे संत | भूतलीया ।।१।।
त्यामधील एक | संत तुकाराम
विठ्ठल ते नाम | मुखी असे ।।२।।
ज्ञानदेव माझा | फुलवी पळस
तुका तो कळस | झाला असे ।।३।।
विठ्ठल चरणी | टेकवीत माथा
लिहिलीसे गाथा | भक्तीभावे ।।४।।
इंद्रायणी मध्ये | बुडाले अभंग
भक्त झाले दंग | तरंगता ।।५।।
स्वर्गी नेण्या आले | पुष्पक विमान
तुकोबांचा मान | देवाघरी ।।६।।
शरीर रूपाने | नाही दिसे जरी
असे घरोघरी | तुकाराम ।।७।।
*अख़्तर इब्राहिम पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*