You are currently viewing महिला दिनानिमित्त लावण्यसिंधु व सिंधुरत्न फाउंडेशन तर्फे सौ. शितल सावंत यांचा भव्य सत्कार

महिला दिनानिमित्त लावण्यसिंधु व सिंधुरत्न फाउंडेशन तर्फे सौ. शितल सावंत यांचा भव्य सत्कार

कणकवली :

कणकवली येथील “लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्था आणि सिंधुरत्न फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी कणकवलीतील व्यावसायिक तथा खादी ग्रामोद्योगच्या व्हाईस चेअरमन सौ. शितल सावंत यांचा सत्कार चित्रपट अभिनेत्री सौ.अक्षता कांबळी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर लावण्यसिंधू संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर,संचालिका सौ.प्रांजल पराडकर,श्री संतोष सावंत,तसेच सौ. रोझा खडपक्रर,व सौ.रिया सांगेलकर,समुपदेशक ,पोलिस स्टेशन कणकवली याउपस्थित होत्या.
जगभरात 8 मार्च रोजी होणारा जागतिक महिला दिन गेली कांहीं वर्षे लावण्यसिंधू संस्थेतर्फे साजरा केला जातो.यानिमित्ताने महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी खास उपस्थित असलेल्या कणकवली पोलिस स्टेशन येथील समुपदेशक सौ.रोजा अभय खडपकर व सौ.रिया सांगेलकर यांनी उपस्थित महिलांना कौटुंबिक तंटे स्मुपदेशाद्वारे कसे सोडविले जातात याबाबत मार्गदर्शन केले.
अनेक वर्षे खडतर मेहनत घेऊन मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या सौ.अक्षता कांबळी या माझ्या मैत्रिणीकडून आपला सत्कार होत असल्याने मला हि कौटुंबिक मायेची थाप मिळत असल्याचा आनंद होत असल्याचे सांगून सौ.सावंत यांनी आपणही महिलांसाठी करीत असलेल्या कार्याची माहिती व्यक्त केली.सौ .खडपकर व सौ. सांगेलकर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना संस्थेतर्फे सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.शेवटी सौ.प्रांजल पराडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा