*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि.ग.सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बीज संस्कारांचे*
****************
अज्ञानात सुख खरे
मौनात मनःशांती
स्पर्शात दिव्यानुभूती
समर्पणी आत्मशांती…..
हे बीज संस्कारांचे
अंतरी रुजवीत रहावे
उरि भास कैवल्याचा
होता कृतार्थ व्हावे…..
कृपावांत एक भगवंत
नित्य निश्चिन्त तारणारा
त्याला भजतची रहावे
अंती तोच एक सहारा…..
*********************
*रचना क्र. ४४/ १५ / ३ / २०२४*
*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*
*📞( 9766544908 )*