You are currently viewing चित्रकाव्य

चित्रकाव्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चित्रकाव्य*

 

आयुष्याचा ढळता सूर्य
मावळतीला आता जाता
सखये तूच सोबती
धरू आधाराच्या हाता…….

तू दिली जीवनी साथ
सुखकर झाले जगणे
कधी काळोखाच्या रात्री
मनी कधी हसले चांदणे…

पंखात भरूनी शक्ती
पाखरे उडाली दूर
घरटेही सुने सुने
बदलला कसा हा नूर……

आयुष्य सांज ही आता
काढायची सहवासात
हातात हात हा धरुनी
चालू या वाट अज्ञात……।।

****** ****** ******
अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा