You are currently viewing केशवसुतांचा वारसा जतन करण्याचे नव्या पिढीचे कार्य कौतुकास्पद : विकास सावंत

केशवसुतांचा वारसा जतन करण्याचे नव्या पिढीचे कार्य कौतुकास्पद : विकास सावंत

केशवसुतांचा वारसा जतन करण्याचे नव्या पिढीचे कार्य कौतुकास्पद : विकास सावंत

‘कोमसाप’तर्फे सतिश पाटणकर व संजय कात्रेंना पुरस्कार प्रदान

स्व. प्रा. मिलिंद भोसले व ॲड. दीपक नेवगींच्या स्मृतींचा जागर

सावंतवाडी

साहित्य हे नेहमीच प्रगल्भ असलं पाहिजे. साहित्यिकांनी आपला धर्म कधीही सोडू नये. राणी पार्वती देवी प्रशालेच्या या संकुलात कवी केशवसुत शिक्षक होते. याच ढोलकाठीवर बसून कविवर्य डॉ. वसंत सावंत यांनी कविता लिहिल्या आहेत. हा वारसा ही परंपरा जोपासण्याच काम कोमसापच्या माध्यमातून ही नवीन पिढी करत आहे हे कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार विकास सावंत सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांनी काढले.

दरम्यान, ॲड. दीपक नेवगी यांनी आपल्या कार्यकालात सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलं. तर स्व. प्रा. मिलिंद भोसले या प्रशालेतच प्राध्यापक होते‌. मराठी विषयावर त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेतून त्यांची उंची खूप मोठी असल्याचं जाणवायच, अशा महनीय व्यक्तींच्या नावाने देण्यात आलेले पुरस्कार स्तुत्य आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्यावतीनं स्व.प्रा. ‌मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जाहिर पुरस्कार निवेदक तथा आदर्श शिक्षक प्रा. संजय कात्रे यांना प्रदान करण्यात आला. तर कै.ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जाहिर पुरस्कार साहित्यिक, नाटककार, पत्रकार तथा मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतिश पाटणकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना विकास सावंत यांनी कोमासापच्या कार्याचे कौतुक केले.

पुरस्काराला उत्तर देताना संजय कात्रे, सतिश पाटणकर यांनी मनोगत व्यक्त करत ऋण व्यक्त केले. याप्रसंगी कोमसापचे अध्यक्ष संतोष सावंत, प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष

ॲड. दिलीप नार्वेकर, सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केली. तसेच यावेळी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर दोन गटात आयोजित केलेल्या निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. ही स्पर्धा पत्रकार अमोल टेंबकर यांच्या मातोश्री स्व. सौ.मंदा टेंबकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती‌.

याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, सावंतवाडी न.प.मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक, सौ. उषा परब, कोमसाप अध्यक्ष संतोष सावंत, डॉ. जी. ए. बुवा, प्रा‌. विजयप्रकाश आकेरकर, अमोल टेंबकर, दीपाली नेवगी, अनिल भोसले, अमोल सावंत, चंद्रकांत सावंत, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, अँड. अरूण पणदुरकर, अँड. नकुल पार्सेकर, भरत गावडे, दीपक तुपकर, दीपक पटेकर, चंद्रकांत कात्रे, सौ.‌संपदा कात्रे, विनायक गांवस, नीरज भोसले, मंगेश मेस्त्री, सर्वेश राऊळ, नितेश देसाई, भुवन नाईक, कमलाकर कळंगुटकर, महेश पास्ते, प्राची दळवी, भाई साटेलकर, श्री. धुरी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमसापचे सहसचिव राजू तावडे यांनी केलं. सुत्रसंचालन सदस्य विनायक गांवस तर आभार उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी मानले. यावेळी कोमसापाचे सदस्य तसेच साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा