*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वहिवाट*
आज कितीतरी दिवसांनी
मला पुन्हा एकदा
कविता भेटली
आजही ती चिरतरुण
लावण्य आणि सौंदर्याने
परिपूर्ण परिपक्व
अप्सरा जणू काही…..
तिचा सुडौल बांधा आजही
तितकाच नजरेत भरला
जेव्हा मी कधीकाळी
तिला
पहिल्यांदा बघितले होते
वहिच्या पहिल्या पानावर
तिचे हुबहु चित्र
रेखाटले होते…
किती तरी काळ
तिच्या सहवासात घालवला
आणि विस्मरणात गेलो
भ्रमिष्ट झालो
तिच्या नादात
स्वतःलाच विसरलो….
मग तिही हळूहळू
माझ्या पासून दूर होत गेली
आज मला कविता
पुन्हा भेटली
अगदी चिरतरुण
लावण्य सौंदर्याने
परिपूर्ण परिपक्व
अप्सरा जणूकाही…..
यावेळी मी मात्र
माझ्या विवेकबुद्धीला
आवर घातला
आणि
एक कटाक्ष कवितेवर टाकून
पाठ फिरवली
आणि आपल्या
अमुल्य जीवनाच्या वहिवाटेकडे
पाऊल टाकले…..
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर ,धुळे.*
७५८८३१८५४३.