You are currently viewing “श्री गणेश”

“श्री गणेश”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*“श्री गणेश”*

 

गणेशाचे गुण आदर्शांचे करू स्मरण

देई शिकवण मनुष्यास वरदानII धृII

 

माता-पित्यांचे राखे सर्वथा सन्मान

कार्तिकेय बंधू शोभे शिव गौरी नंदन

देव ऋषींना प्रिय सदा राखे सन्मानII1II

 

व्यासांनी सांगितले गणेशा लिहावे सअर्थ

महाभारताचे व्यासांनी सुरू केले कथन

लेखणी तुटली लिहिताना जलदतेनंII2II

 

गणेशांनी तोडला दात टिकावण्या वचन

गणेशांनी सुरू ठेविले लिखाण अखंड

वचनपूर्तीसाठी झाला एकदंतII 3II

 

श्रवण शक्तीची महती गणेशाचे मोठे कान

बाप्पाचे नेत्र लहान पाही सूक्ष्म दृष्टीनं

सर्वांचे अपराध क्षमा करी घेई उदरातII4II

 

श्री अरुण गंगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.

Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा