*भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी प्रकाश पवार यांची निवड*
*भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी नियुक्ती पत्र देत केली निवड जाहीर*
*सिंधुदुर्गनगरी-*
भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा युवा अध्यक्षपदी बंजारा समाजाचे युवा नेते प्रकाश पवार यांची निवड.काही महिन्यापूर्वीच भटके विमुक्त जाती जमाती मधील बंजारा समाजाचे युवा नेतृत्व प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली तब्बल हजारो बंजारा समाजाच्या बंधू भगिनीनी भारतीय जनता पार्टी मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला होता. बंजारा समाजाला एकजूट करण्याची क्षमता वयाच्या 23 व्या वर्षी ज्यांच्याकडे आहे तो भाजपा भटके विमुक्त युवक आघाडीचे संघटन नक्कीच मजबूत करू शकेल अशी खात्री बाळगत भाजप भटके विमुक्त आघडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री नवलराज काळे यांनी आदरणीय केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच माननीय राहुलभैया केंद्रे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी यांच्या मान्यतेने,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या युवक जिल्हाध्यक्ष कु.प्रकाश पवार यांची निवड जाहीर केली. प्रकाश पवार यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा तसेच व्यापक अनुभवाचा उपयोग पक्ष संघटनेच्या कार्यासाठी निश्चितपणे उपयोग होईल तसेच त्यांना दिलेली जबाबदारी ते सर्वांना एकत्र घेऊन पार पडतील असा विश्वास व्यक्त करत नियुक्ती पत्र दिले. यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी,जिल्हा चिटणीस सुशील खरात व इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलत असताना प्रकाश पवार यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करत भाजपा भटके विमुक्त युवक आघाडी जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहणार असे प्रतिपादन केले.युवा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रकाश पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.