You are currently viewing सावंतवाडीतील सुवर्णकाराचा घरातच आढळला मृतदेह

सावंतवाडीतील सुवर्णकाराचा घरातच आढळला मृतदेह

सावंतवाडीतील सुवर्णकाराचा घरातच आढळला मृतदेह

सावंतवाडी

येथील चितारआळी परिसरात राहणारे सुवर्णकार प्रभाकर मंगेश हळदणकर (वय ८६) याचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. ही घटना आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघड झाली. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, हळदणकर हे सायंकाळी उशिरापर्यंत घरातून बाहेर न पडल्याने त्यांच्या कामगारांनी घरात जाऊन पाहिले असता ते पालथ्या अवस्थेत पडलेले आढळून आले. कोणतीच हालचाल नसल्याने त्यांनी शेजाऱ्यांना त्याची कल्पना देत डॉक्टरांना पाचारण केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ते मृत असल्याचे घोषित केले. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झालेला आहे. त्यामुळे ते पडून जखमी झाले असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे. ते घरी एकटेच राहायचे. त्यांचा मुलगा वकिल असून मुंबईत असतो. दोनच दिवसांपूर्वी येऊन गेला होता. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते जून्या घरी राहत होते. दरम्यान उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते. तसेच पोलीस ठाण्यात या प्रकाराची कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा