You are currently viewing शिरवल मुख्य रस्त्याचे सरपंच गौरी वंजारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भुमीपूजन

शिरवल मुख्य रस्त्याचे सरपंच गौरी वंजारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भुमीपूजन

*शिरवल मुख्य रस्त्याचे सरपंच गौरी वंजारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भुमीपूजन*

*शिरवल‌ ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती विकासकामे मार्गी लावून करत आहोत. – उपसरपंच प्रविण तांबे*

*शिरवल येथे करण्यात आले विविध विकासकामांचे भूमिपूजन .*

कणकवली

कणकवली शिरवल मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आणि इतर विविध विकासकामांचे भूमिपूजन शिरवल सरपंच गौरी वंजारे यांच्या हस्ते बुधवारी श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी उपसरपंच प्रविण तांबे म्हणाले की,उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आणि खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून शिरवल गावातील विविध विकासकामांना कोट्यावधीचा निधी मिळाला आहे.शिरवल‌ ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती विकासकामे मार्गी लावून करत आहोत.शिरवल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

यावेळी शिरवल सरपंच गौरी वंजारे ,ग्रामपंचायत सदस्य प्रीती सावंत, चैताली पांचाळ , ग्रामपंचायत सदस्य रविकांत तांबे, शिरवल सोसायटीचे चेअरमन रविकांत सावंत, प्राणजीवन सहयोग संस्था शिरवलचे अध्यक्ष तथा समाजसेवक संदीप चौकेकर, अमोल सावंत, प्रमोद सावंत, प्रमोद नानचे,माजी सरपंच मनोज राणे ,दत्तात्रय प्रभू पाटकर, विजय शिरवलकर,श्रीकृष्ण यादव, चंद्रकांतकुडतरकर,गुरुप्रसाद वंजारे,राजन वंजारे, बाळकृष्ण वंजारे,मंगेश तांबे, चेतन शिरवलकर,राजन शिरसाट,राज प्रभु पाटकर, अरुण चौकेकर ,अजय चौकेकर, साहिल गावडे, किरण गावडे, गणेश देसाई,माजी सरपंच सुधा कुडतरकर,अनुष्का सावंत, सुचिता सावंत, पूजा सावंत, दीप्ती सावंत ,शुभांगी धुरी,तनिष्का कुडतरकर ,आनंदी कोरगावकर आदी ग्रामस्थ शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपसरपंच प्रविण तांबे म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शिरवल मुख्य रस्त्याच्या काम होत असल्याने शिरवल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याचे काम प्रलंबित होते.या रस्त्यासाठी 3 कोटी 7 लाख निधी मंजूर झाला आहे.त्यामुळे शिरवल रस्ता सुस्थितीत होणार असल्याने वाहनधारक आणि ग्रामस्थांनी
समाधान व्यक्त केले आहे.शिरवल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण निधीसाठी पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.

,शिरवल मुख्य रस्ता ग्रा.मा. ३९३ खडीकरण व डांबरीकरण करणे.३ कोटी ७ लाख,जलजीवन मिशन अंतर्गत शिरवल येथे नळ पाणीपुरवठा योजना करणे.1 कोटी 49 लाख,शिरवल बोध्दवाडी सावरभाटले रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.9 लाख 91 हजार,शिरवल सावरभाटलेवाडी साकवाजवळ बंधारा बांधणे.26 लाख, आणि बीएसएनएल टॉवर आदी कामांचा माध्यमातून कोट्यवधी चा निधीतून विकास कामे मार्गी लागत आहेत.या कामांची आज भुमिपूजने जेष्ठ ग्रामस्थ दत्तात्रय प्रभू पाटकर, समाजसेवक संदीप चौकेकर यांच्या हस्ते विकासकामांची भूमिपूजने करण्यात आली.

फोटो ओळ – कणकवली शिरवल येथे शिरवल मुख्य रस्त्याचे भूमिपूजन करताना सरपंच गौरी वंजारे सोबत उपसरपंच प्रविण तांबे, संदीप चौकेकर आणि ग्रामस्थ

प्रतिक्रिया व्यक्त करा