सावंतवाडी येथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नव्याने सुरू करण्यात आलेल्या “पनवेलकर ज्वेलर्स” च्या नव्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अशीच प्रगती करत रहा, ग्राहकांना उत्तम सेवा देवून अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवा, अशा शुभेच्छा यावेळी पनवेलकर कुटुंबीयांना केसरकर यांनी दिल्या.
उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलकर ज्वेलर्सच्या माध्यमातून मजुरीवर ३० टक्केची विशेष सूट देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेलकर ज्वेलर्सच्या माध्यमातून राजू पनवेलकर यांनी केले आहे. यावेळी सुवर्णकार राजेश पनवेलकर, मधुरा पनवेलकर, दयानंद कारेकर, विक्रम गोरेगावकर, राकेश धोत्रे, राजेंद्र मडगावकर, राजन पोकळे, नंदू शिरोडकर, नरसिंह गुवणेकर आदी उपस्थित होते.