महामार्गावर खारेपाटण पासून पात्रादेवी पर्यंत होणाऱ्या सुशोभीकरणासाठी 12 कोटी निधी मंजूर तर आडाळी येथे आयुष मंत्रालयाचा प्रकल्प
दोन्ही कामांची 14 मार्च रोजी भूमिपूजन ; केंद्रीय मंत्री नारायण राणे
सिंधुनगरी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्ग नव्या कल्पकतेमुळे शोभा आणखी वाढवेल व या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटक व प्रवाशाना आनंद देईल यासाठी आपल्या प्रयत्नातून केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी खारेपाटण पासून पात्रादेवीपर्यंत होणाऱ्या सुशोभीकरणासाठी बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वयाचे भूमिपूजन 14 मार्चला होणार आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हेही उपस्थित होते.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या वाहन चालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. या मार्गाच्या मधल्या जागेत सुशोभीकरण व्हावे असे आपल्याला वाटले. रस्त्याच्या मधल्या जागेत वाघ सिंह स्टॅच्यू असं काहीतरी कल्पक असावा या दृष्टीने आपण एक लेखी पत्र नितीन गडकरी यांना दिले होते. त्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला असून हे काम आहे आता सुरू होईल.
आडाळी एमआयडीसी विकसित करण्यासाठी व तेथील उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल प्लांट या प्रकल्पाचा शुभारंभ ही 14 मार्च रोजी होत आहे. आयुष मंत्रालयाचा हा प्रकल्प असून या एमआयडीसीमध्ये तो लवकरच सुरू करण्याचा मानस आहे. या एमआयडीसी मध्ये विविध प्रकारचे 500 ते 600 कारखाने आणण्याचा आपला प्रयत्न आहे. जंगलातील वनसंपदा व वनौषधी शोधण्यासाठी व त्यावर रिसर्च करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या आधारावर येथे कारखानदारी सुरू करण्याचाही प्रयत्न आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशीही आपले नुकतीच चर्चा झाली असून काही कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.
लोकसभेच्या जागेबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची आपली चर्चा झाली असून जोपर्यंत पक्षश्रेष्ठी उमेदवार निश्चित करत नाहीत तोपर्यंत आपण यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही जो उमेदवार देतील तो मला मान्य असेल असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी राणे म्हणाले कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात टेक्निकल प्रशिक्षणअध्यात्मिक इमारत लवकरच उभी होईल येथील तरुणांना प्रशिक्षित करून तांत्रिक उद्योग वाढण्यासाठी मदत होईल जिल्ह्यात उद्योग वाढवून देशाचे आणि राज्याचे आर्थिक उत्पन्न वाढेल नवे नवे तंत्रज्ञान उद्योग दोडामार्ग येथे अनेक कारखाने येऊ घातले असून या कारखान्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना आणि राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.कोकण रेल्वे ही सध्या दहा हजार कोटी तोट्यात चालली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण भारतीय रेल्वे कडे कोकण रेल्वे देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा अशी सूचना यापूर्वी केली आहे. केरळ कर्नाटक व अन्य राज्यांनी तो प्रस्ताव सादर केला आहे. आजच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार त्यावेळी याबाबत सविस्तर चर्चा करून भारतीय रेल्वे कडे कोकण रेल्वे समाविष्ट करावे तसेच मिनी ट्रेनचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला आहे. त्या प्रस्तावा बाबतही आपण सकारात्मक भूमिका घेतली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम पूर्णत्वाकडे आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण ते पात्रादेवी या राष्ट्रीय महामार्गावरपर्यटनाच्या दृष्टीने सुशोभिकीकरण करण्याबाबत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी १२ कोटी रुपये मंजूर केले आहे या निधीतून पर्यटन दृष्ट्यामहामार्गाच्या दुतर्फा सुशोभीकरण काम हाती घेण्यात येत असल्याचे सांगताना १४ मार्च रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले केंद्र सरकारकडे सिवल्ड ,हिस्टलँडप्रकल्प बाबत प्रस्ताव सादर केला असून केरळ व अन्य जिल्ह्यांनीही याबाबत मागणी नोंदवली आहे परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा प्रकल्प होण्याबाबत आपण आग्रही असल्याचे राणे म्हणालेलोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत आपली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी केंद्राकडून उमेदवारी जाहीर केली जाईल का या प्रश्नावर राणे यांनी आपण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आहे या चर्चेतून मतदार संघाचा योग्य अहवाल सादर केला आहे पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील व जो उमेदवार देतील तो मला मान्य आहेभाजपामध्ये पक्षाने निर्णय घ्यायचा असतो पक्षाच्या निर्णयाच्या आधी आम्ही कोणीही कोणतेही भाष्य करू शकत नाहीअसे सांगतानासिं