*आजचे चिंतन*
=========
*मी कोण* कोहम्?
I am, I am, I am…
Who am I ?
स्व ची ओळख करून घेणं अत्यावश्यक आहे.
मी ऊर्जा आहे. Energy आहे.
माझे अतीत्व आत्मा म्हणून आहे.
मी शरीर नाही. शरीर हे माझं एक साधन आहे.
मी आत्मा आहे याचं ज्ञान होणं म्हणजेच अध्यात्म समजणं.
स्वतः च सत्य स्वरूप ओळखणं म्हणजे अध्यात्म समजणं.
जीवनात दुःख आहे कारण तुम्ही स्वतःला देह समजता, तुम्ही देह नसून आत्मस्वरूपी आहात, चैतन्य स्वरूप आहात, चैतन्य, आत्मा, ब्रह्म… एकच आहे, देह भिन्न आहेत, देह कारण परत्वे प्राप्त झालेला आहे त्याला काल मर्यादा आहे. चैतन्याला नाही, चैतन्य अमर आहे, आपण आत्मा चैतन्य स्वरूप आहोत हे आपल्याला कळण यालाच मोक्ष म्हटले आहे.
आपण सर्वजण कर्म ऋणानुबंधात अडकल्यामुळे मूळ अस्तित्व चैतन्य आहे हे आपल्याला कळत नाही ते कळावं म्हणूनच सद्गुरु असतात. त्यांच्यामाध्यमातून आपणास आत्मबोध होतो.
🙏🌹👍 *पांडुरंग कुलकर्णी * 👍🌹🙏