*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार, निवेदिका अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सावित्री*
माय सावित्री !
किती वर्णावी तुझी थोरवी
तुझ्यामुळेच आम्हाला
जगण्याची दृष्टी मिळाली नवी
जोतिबासारख्या झंझावाताला
तू दिली बुलंद साथ
तुम्ही दोघांनी मिळून
काळावर केली मात
म्हणूनच मानव
गुलामगिरीतून मुक्त झाला
अस्पृश्यतेचा कलंक दूर करुन
तुम्ही वाटला ज्ञानाचा उजेड
सावित्री
तू या देशातील पहिली शिक्षिका
दगडगोटे झेलूनही
तू तुझी वाट सोडली नाही
म्हणूनच या देशात
क्रांती झाली
शिक्षणाची पहाट
घराघरात अवतरली
सावित्री
आम्हीही चालत राहू
तुझ्याच वाटेने
उजेड वाटत !
कवयित्री
अनुपमा जाधव
डहाणू
भ्रमणध्वनी ८७९३२११०१७