सिंधुदुर्गातील कलाकारांनी कथक, भरतनाट्यम, पखवाज जुगलबंदीने दक्षिण प्रांतातही कलेचे रोवले झेंडे
कुडाळ
कर्नाटक प्रांतात श्री क्षेत्र मुरुडेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त गायन वादन नृत्य रंगले आणि सिंधुदुर्गातील कलाकारांनी कथक, भरतनाट्यम, पखवाज जुगलबंदीने दक्षिण प्रांतातही आपल्या कलेचे झेंडे रोवले………. श्री जगन्नाथ संगीत विद्यालय (पखवाज अलंकार श्री महेश सावंत) आणि नुपूर कला केंद्र (सौ.अनुजा गांधी मॅडम ) आणि सिद्धाई डान्स अकॅडमी(सौ.कविता राऊळ – शेट्ये मॅडम) यांनी संयुक्तपणे आपल्या शिष्यवर्ग कलाकारांसह दक्षिणेत सुद्धा आपल्या संगीत कलेचा झेंडा रोवला, महाशिवरात्री उत्सव पुराण प्रसिद्ध क्षेत्र तसेच पर्यटन स्थळ श्री मुरुडेश्वर येथे भक्तिमय जागरण रात्र उत्सवात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते सिंधुदुर्गातील कलाकारांनी आपली कला सादर करुन भगवान शंकराला संगीत कलेच्या नटेशाला आपल्या कलेने प्रसन्न करुन तेथील उपस्थित संगीत रसिकांची मने जिंकली पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या मार्गदर्शनात पखवाज विशारद श्री दत्तप्रसाद खडपकर,श्री सचिन कातवणकर यांच्यासह श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या 75 पखवाज वादक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच कथक नुपूर कला केंद्राच्या विशारदा सौ. अनुजा गांधी मॅडम यांनी आपल्या 11 कथक विद्यार्थिनी समवेत सहभाग घेतला तसेच सिद्धाई डान्स अकॅडमी च्या नृत्य प्रशिक्षिका सौ. कविता राऊळ – शेट्ये मॅडम यांनी आपल्या 11 विद्यार्थिनी समवेत सहभाग घेतला याकरिता गायक/हार्मोनियम वादक म्हणून श्री अमित उमळकर यांनी धुरा सांभाळली तसेच गायक प्रफुल्ल रेवंडकर आणि धनश्री मेस्त्री व काशिष खडपकर यांनीही आपल्या गायन शैलीने रसिकांची मने जिंकली, तबला विशारद श्री अतुल उमळकर, साईश उमळकर, विनायक जोशी यांनी केले,ढोलकी वादन ओंमकार वेंगुर्लेकर,श्रीपाद पडोसकर, वेदांत मांजरेकर, विनय तिवरेकर, तुषार गोसावी,रुपेश माडये यांनी केले तर तालरक्षक म्हणून मनोहर वालावलकर व नारायण सावंत यांनी काम पाहिले मुरुडेश्वर देवस्थान चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री मंजुनाथ शेट्टी साहेब यांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले तसेच श्री उमेश मेस्ता, कुमार मेस्ता,गायक नरसिंहा (कर्नाटका )यांचे बहुमोल सहकार्य लाभले, श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक डॉ. श्री दादा परब व बुवा भजनसम्राट श्री भालचंद्र केळुसकर यांनीही या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे यापुढेही आपल्या कोकणच्या संगीत कलेचे नाव प्रचार प्रसार करुन भविष्यात अजूनही असे संगीत दौरे करुन खूप मोठे उंचावू असे उदगार पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांनी यावेळी काढले