*संपूर्ण महाराष्ट्रातून व कोकणातून जास्तीत जास्त अधिकारी घडवणारच – श्री. सत्यवान यशवंत रेडकर*
*(२५०व्या निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानात विद्यार्थ्यांना संबोधन)*
कोकण भूमिपुत्र व संपूर्ण महाराष्ट्रात तिमिरातूनी तेजाकडे ही यशस्वी व झंजावाती व्याख्यानां द्वारे शैक्षणिक चळवळ राबवणारे मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी
दिनांक ९ मार्च २०२४ रोजी बंट्स इंस्टिट्यूट फॉर हायर एजुकेशन, जुईनगर च्या प्राचार्या डॉ. रश्मी दर्शन चितलांगे यांच्या सहकार्याने बी. कॉम. आणि एम. कॉम च्या विद्यार्थ्यांसाठी २५०वे मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले.
IQAC चे समन्वयक सी. ए. प्रथमेश पाटील यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी, स्पर्धा परीक्षांबद्दल आकर्षण निर्माण होऊन स्पर्धा परीक्षेसाठी काय करावे व परीक्षेची तयारी कशी करावी? याचे ज्ञान मिळावे या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षेची माहिती देण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तिमिरातुनी तेजाकडे या संस्थेचे संस्थापक, मुंबई सीम शुल्क चे कनिष्ठ अनुवाद अधिकारी, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांना आमंत्रित केले होते, त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत हसत खेळत व आनंदमयी वातावरणात सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच या वेळी प्रा. सोनम चव्हाण, प्रा. निधी सावंत, प्रा. आकृती जाधव, प्रा. आरती जाधव, प्रा. सिद्धीका ठाकूर हे या प्रसंगी उपस्थित होते. १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आभार प्रदर्शन श्री. पी. ए. देशमुख यांनी केले.