मालेगाव / प्रतिनिधी :
दि २७ फेब्रुवारी २०२४ रोजी जागतिक मराठी भाषा दिन कुसुमाग्रज जयंती म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने साहित्य क्षेत्रातील विशेष योगदाना बद्दल विविध साहित्यिक कवी आणि लेखक यांचा न्यूज़ पेपर गंगाधर साहित्य परिषद कोल्हापुर च्य वतीने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
मालेगाव जि नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी व लेखक संजय मुकूंदराव निकम यानी लिहिलेली ठिणगी एक ज्वलंत परिवर्तनाचा इतिहास या राजकिय आणि सामाजिक धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या कादंबरीचा उत्कृष्ट कादंबरी म्हणुन पसंती मिळाली. मराठी साहित्य क्षेत्रातील विशेष योगदान बद्दल लेखक संजय मुकूंदराव निकम याना राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच हेलपाटा या लेखक तानाजी धरणे यांच्या कादंबरीला राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार महाराष्ट्र देऊन गौरवण्यात आले.
विविध साहित्य प्रकारातील लेखनासाठी साहित्यिकाचा मोठ्या जल्लोषात श्री पाल सबनीस आणि श्री कमलाकर वर्टेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.