You are currently viewing वेंगुर्ल्यात भाजप महिला मोर्चा ४१ जणांची तालुका कार्यकारिणी जाहीर..

वेंगुर्ल्यात भाजप महिला मोर्चा ४१ जणांची तालुका कार्यकारिणी जाहीर..

वेंगुर्ले :

 

भाजप कार्यालयात वेंगुर्ले तालुका महिला मोर्चा कार्यकारिणीची बैठक महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.‌श्वेता कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नूतन महिला तालुका अध्यक्ष सौ. सुजाता पडवळ यांनी आपली ४१ जणांची तालुका कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये माजी नगरसेविका श्रेया मयेकर यांची वेंगुर्ले शहरअध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून समिधा कुडाळकर, श्रद्धा धुरी व श्वेता चव्हाण यांना तालुका उपाध्यक्ष पदावर संधी देण्यात आली आहे.

नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना जिल्हा अध्यक्षा सौ श्वेता कोरगांवकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ.वृंदा गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्षा ॲड.सौ. सुषमा प्रभूखानोलकर, तालुका अध्यक्षा सौ. सुजाता पडवळ, यांनी मार्गदर्शन केले व पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला सुरुवात करण्यास सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष श्री सुहास गवंडळकर यांनी ही नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. दरम्यान उर्वरित कार्यकारणी मध्ये तालुका सरचिटणीस पदी सौ. आकांक्षा परब, दिपाली दाभोलकर यांची निवड झाली. तर चिटणीस पदी प्रार्थना हळदणकर, स्नेहा गोडकर, सिद्धी तावडे, अस्मिता मेस्री यांची निवड करण्यात आली.

तालुक्यातील कार्यकारिणीत ४१ महिला सदस्य निवड करण्यात आल्या. शहर कार्यकारिणी मध्ये शितल आंगचेकर, सौ .साक्षी पेडणेकर, ईशा मोंडकर यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर सौ. पूनम जाधव व सौ. रसिका मठकर यांची शहर सरचिटणीस पदी, व मानसी परब व वृंदा मोर्डेकर यांची चिटणीस पदी निवड करण्यात आली. हसिनाबेगम मकानदार व सौ. मानसी परब यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.

तसेच मातोंड सरपंच सौ मयुरी वडाचेपाटकर, तुळस ग्राम पंचायत सरपंच सौ. रेश्मा परब, पाल ग्राम पंचायत सरपंच कावेरी गावडे, सदस्य स्नेहल पालकर, खानोली माजी सरपंच सौ प्रणाली खानोलकर, माजी सरपंच भाग्यलक्ष्मी घारे, वायंगणी ग्रामपंचायत सदस्य सौ.सविता परब, सौ. विद्या गोवेकर, सौ.राखी धोंड, कु.किरण मातोंडकर यांची तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व महीलांचा जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांनी नियुक्तीपत्र आणि गुलाब पुष्प देत सन्मान केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा