पहिल्या टप्प्यात सातशे जणांना लस
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यात कोरोना लसीकरणाची तयारी सुरु झाली असून पहिल्या टप्प्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डाॅक्टर, कर्मचारी अशा प्रकारे सुमारे सातशेजणांचे लसीकरण होईल.
दुसऱ्या टप्प्यात खासगी डाॅक्टर, क्लिनीकमधील कर्मचारी यांना तर तिसऱ्या टप्प्यात ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, ५५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक यांना लस देण्यात येणार आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात येणार असल्याने लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक असून लसीचे दोन डोस देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या मोहिमेसाठी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार केला असून त्यांची लसीकरणासंदर्भात बैठकही झाली आहे.