You are currently viewing ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी ( फेस्कॉन ) चा जीवनगौरव पुरस्कार आचरे गाऊडवाडी येथील ज्येष्ठ रंगकर्मी तानाजी पांगे यांना जाहीर

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी ( फेस्कॉन ) चा जीवनगौरव पुरस्कार आचरे गाऊडवाडी येथील ज्येष्ठ रंगकर्मी तानाजी पांगे यांना जाहीर

आचरा

 

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे ( फेस्कॉन संलग्न ) या संस्थेचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार 2024 आचरे गाऊडवाडी येथील ज्येष्ठ रंगकर्मी तानाजी संभाजी पांगे यांना जाहीर झाला आहे.सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, मानचिन्ह ,शाल ,श्रीफळ असे असून सदर पुरस्काराचे वितरण आचरे येथे मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वार्षिक अधिवेशनात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल अशी माहिती अशोक कांबळी, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.सदर पुरस्कार निवडीसाठी कार्यकारणीची स्वतंत्र निवड समिती असून त्या समितीने तानाजी संभाजी पांगे यांची सर्वानुमते निवड केली आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी तसेच आचरे येथील विविध व्यक्ती आणि संघटना यांच्या वतीने तानाजी पांगे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

तानाजी पांगे यांनी गेले अर्धशतक एक

रंगकर्मी म्हणून रंगदेवतेची निष्काम सेवा केलेली आहे. मुंबई येथे कामगार रंगभूमीपासून आचरे पंचक्रोशी सारख्या ग्रामीण रंगभूमीची नाळ त्यांनी आपल्या निष्कामसेवेने जोडली आहे गेली पन्नास वर्षे नाट्यलेखन, दिग्दर्शन,अभिनय, सादरीकरण या क्षेत्रात पांगे यांनी आपले तन मन धन अर्पण केले आहे.आपली आर्थिक परिस्थिती बेताची असताना या नाट्यकर्मीने रंगभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले आहे

‘दैव हवे सोबतीला’, ‘उष्ट्या पत्रावळी’ आणि ‘वाट वेगळी नियतीची ‘ अशी अनेक नाटके त्यांनी लिहून दिग्दर्शित केलेली आहेत. ही नाटके एकेकाळी शहरी आणि ग्रामीण भागात गाजली.

तरुणांसाठी नाट्य प्रशिक्षण घेणे, त्यांच्या नाट्य मंडळाचे नाटक दिग्दर्शित करणे आदी सेवा पांगे यांनी छंद म्हणून जोपासला. त्यांच्या अविरत रंगभूमीच्या सेवेचे कौतुक म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे.

प्रतिवर्षी विविध क्षेत्रात युवक, युवती, स्त्रिया, जेष्ठ यांचा स्नेहमेळाव्यात जीवनगौरव देऊन सत्कार होतो. हे वर्ष ज्येष्ठ सेवावृत्ती पुरस्काराचे सेवावृत्ती पुरस्काराचे असल्याने श्री तानाजी पांगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असे कांबळी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा